पुणे : लोणीकंद वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी काही रस्ते आणि चौकांमध्ये सर्व प्रकारचे जड, अवजड, डंपर, आर.एम. सी. मिक्सर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मंदगती वाहनांना दिवसातील काही निश्चित कालावधीत वाहतूक बंदी आणि पार्किंग करण्यास बंदी करण्यात आली आहे.
सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना पुणे-नगर मार्गावरील वाघेश्वर चौक, वाघोली ते खराडी बायपास, वाघोली ते लोणीकंद, केसनंद मार्गावर वाघोली ते शिवाजी चौक-केसनंद गाव, लोहगाव-वाघोली मार्गावर लोहगाव चौक, वाघोली-लोहगाव ते धानोरी मार्गे विश्रांतवाडी या दरम्यान सकाळी ७ ते ११ आणि सायं. ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक बंदी तसेच पार्किंग करण्यास बंदी केली आहे.