पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि आमदार महादेव जानकर महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार आणि बारामतीचा उमेदवार बदलणार या चर्चांवर आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसने जानकरांना पाठिंबा दिला, ही विरोधकांनी पसरवलेली अफवाआहे. तसेच बारामतीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता बारामतीमधून महायुतीच्या तिकिटीवर सुनेत्रा पवार याच उमेदवार असणार असे अप्रत्यक्षपणे अजित यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटप अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले की, आजच्या बैठकीत बारामती, शिरूर, सातारा , धाराशिव, नाशिक, रायगड आणि परभणी लोकसभा जागांसंदर्भात चर्चा झाली. परभणीचा लोकसभेसाठी उमेदवार दोन दिवसांत ठरणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.