युनुस तांबोळी
NMMS Exam | शिरूर : टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील बापुसाहेब गावडे माध्य-उच्च माध्य विद्यालयातील विद्यार्थ्यांचे NMMS परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये झालेल्या “राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती” परिक्षेत विद्यालयाचे 8 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी प्रतिवर्षी 12000 रूपयांची स्काॅलरशिप मिळणार असून एकूण 5 वर्षासाठी 60,000रूपये स्काॅलरशिप मिळणार आहे. त्याचप्रमाणे सारथी शिष्यवृत्तीसाठी 2 मुलांची निवड झाली असून त्यांना प्रत्येकी 9600 रूपये प्रतीवर्ष याप्रमाणेच पाच वर्षासाठी 48000 रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
NMMS शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
1) वराळ सई राजू-143
2) कि-हे आदित्य रामदास-124
3) दुडे रिद्धी अनिल-115
4) खामकर गौरव नंदू-113
5) कळकुंभे आदित्य सुनिल-112
6) आटोळे पूर्वा सचिन-108
7) चाटे वेदांत संदीप-106
8) तेलंग संस्कार प्रकाश-102
सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी –
1) दिवेकर सुप्रिया नानाभाऊ-111
2)शितोळे प्रशांत एकनाथ-84
चौधरी के.एन्, बरकले मॅडम, आर. एम्.गावडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे, सचिव राजेंद्र गावडे, सह-सचिव सुनीता गावडे, प्राचार्य आर.बी.गावडे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मंचारी यांनी अभिनंदन करून, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!