पुणे : पुण्यात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) मध्ये ‘जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता : आव्हाने आणि संधी’ या संकल्पनेवर आजपासून १४ जानेवारीपर्यंत तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . तसेच अध्यक्षस्थानी व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार हे देखील यावेळेस उपस्थितीत असतील. परिषदेसाठी 27 देशांतील तज्ज्ञ, अडीच हजार उद्योजक आणि दीड लाखाहून अधिक शेतकर्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.