राहुलकुमार अवचट
यवत : यवत येथील श्री निळकंठेश्वर प्रथम तपपुर्ती व शिवजन्मउत्सव, अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक ८ फेब्रुवारी १९ फेब्रुवारी रोजी श्री निळकंठेश्वर मंदिर यवत स्टेशन रोड येथे करण्यात आले आहे. या सोहळ्याला बुधवार (ता. ८) प्रारंभ झाला.
दिपप्रज्वलन व्यासपिठ चालक ह. भ. प. धनवडे महाराज, ज्ञानेश्वरी पुजन ह.भ.प. नाना महाराज दोरगे, गाथा पूजन, विणा पुजन उपसरपंच सुभाष यादव, ह.भ.प. दिपक महाराज मोटे, प्रतिमा पुजन – विश्व वारकरी संघाचे तालुकाध्यक्ष ह.भ.प. सोनबा महाराज कुदळे, यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बबनराव दोरगे, विष्णूपंत पांढरे रमेश यादव यांसह अनेक वारकरी बंधू उपस्थित होते.
रोज सकाळी अभिषेक, पहाटे ४ ते ६ काकड आरती, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायं. ५ ते ६ हरिपाठ सायं. ६:३० ते ८:३० हरिकिर्तन होणार असून प्रथम दिवसाचे किर्तन बालकीर्तनकार ह.भ.प. स्नेहल खोमणे यांचे संपन्न झाले. तपपूर्ती निमित्त बारा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अनुक्रमे बाल कीर्तनकार ह.भ.प. शंभूराजे जाधव (फलटण), बालकीर्तनकार ह.भ. प. गौरी घिगे ( यवत), बालकीर्तनकार ह. भ.प.आर्यन गोरड (भोर), बालकीर्तनकार ह.भ.प.भक्ती चव्हाण (पुणे), ह.भ. प. सतीश महाराज टिळेकर (राहू), ह.भ.प सतीश महाराज खोमणे (बारामती) ह.भ.प कबीर महाराज आतार (खेडशिवापूर), ह.भ.प दत्तात्रय महाराज दोन्हे (मुळशी), ह.भ.प. दत्तात्रय महाराज सोळसकर (कासुर्डी), ह. भ.प. धर्मराज महाराज हांडे ( पुणे), यांचे कीर्तन होणार आहे.
शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त सायंकाळी ४ वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९.३० वा. शिवचरित्रकार ह.भ. प. प्रवीण महाराज लोळे (पानवडी) यांचे काल्याचे किर्तन, महाप्रसादाची वाटप केले जाईल तर रोज रात्री ८.३० वा. आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप व रात्री ९ वा हरिजागर होईल
यावेळी किर्तनसाथ वरदविनायक वारकरी शिक्षण संस्था राहू, विठ्ठल समाज भजनी मंडळ, यवत, निलकंठेश्वर भजनी मंडळ, यवत. संत सावतामाळी भजनी मंडळ, रायकरमळा हे करणार असून चोपदार ह.भ.प. वाबळे महाराज, भोजन व्यवस्था पापाभाई शेख (भरतगाव), बाळू जाधव, नवनाथ घिगे तर कल्पना स्पीकर ( ह.भ.प.गणेश दोरगे) हे सेवा देणार असून महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन समस्त ढमढेरे परिवार व समस्त शिवभक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आलेले आहे