पुणे : पुणे इसिस मॉड्यूल जगभर गाजत असतानाच अतिरेक्यांसंदर्भात एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. हे दहशतवादी उच्चशिक्षित असून, त्यातील एकाला तब्बल ३१ लाख रुपयांचे पॅकेज होते. या दहशतवाद्यांनी साताऱ्यातील जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली. एवढेच नव्हे तर या दहशतवाद्यांनी देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याची योजना बनवली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेला भायखळा (मुंबई) येथील रहिवासी तबीश सिद्दीकी याच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.
आरोपपत्रात भायखळा ते इसिस प्रवासाची माहिती दिली आहे. सिद्दीकी हा २०१८ मध्ये जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये आठवडाभर राहिला. त्या ठिकाणावरुन इसिसला माहिती दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. ‘एनआयए’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात भायखळ्यातून तबीश हा जम्मू काश्मीरमध्ये गेला. त्याठिकाणी राहून तो ‘आयसीस’ला माहिती पुरवत होता.
‘एनआयए’ने आता तबीश सिद्दीकीसह ६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये आयसीस वाढवण्यासाठी काय करता, येईल यावर तो चर्चा करत होता. जम्मूच्या कुपवाडामध्ये तबीश आठवडाभर राहिला. तेथून ‘आयसीस’ला जम्मूमधील परिस्थिती आणि इतर माहिती तो देत होता.
‘एनआयए’ने आरोपपत्रात आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत. इसिस मॉड्यूलमधील दहशतवाद्यांनी भिवंडीमधील पडघा येथे आपले स्थळ करून या गावाला अल् शाम नाव ठेवले होते. तसेच सिरीयाचा भाग म्हणून जाहीर केले होते. या गावात देशभरातून आलेल्या अनेकांना प्रशिक्षण देण्याची तयारी होती. ‘एनआयए’ने महाराष्ट्र आयसीस मॉड्यूल प्रकरणात अटक केलेले जुल्फीकार बरोडावाला आणि आणखी एक आरोपी आयटी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. तसेच जुलफीकारला वर्षकाठी ३१ लाखांचे पॅकेज होत अशी माहिती दोषारोप पत्रात दिली आहे.