राजु देवडे
लोणी धामणी, ता. २२ : धामणी (ता. आंबेगाव) येथील पोलीस पाटिल पद हे अनेक दिवसांपासून रिक्त होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाला अनेक अडचणी येत होत्या. तसेच विद्यार्थी व नागरिकांना शासकीय कामात पोलीस पाटिल नसल्याने अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. अडथळा निर्माण होत होता. शासनाने पोलीस पाटलांच्या रिक्त झालेल्या जागांची नव्याने भरती केल्या आहेत. त्यामध्ये धामणी गावची पोलिस पाटिल जागा भरण्यात आली.
पोलीस पाटलाच्या भरतीसाठी शासकीय परिक्षा, मुलाखती घेण्यात आल्या त्यामध्ये सुरज सुधाकर जाधव हे उत्तीर्ण झाले व त्यांची पोलीस पाटिल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे औचित्य साधुन आज धामणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सत्कार सोहळ्यात अॅड विठ्ठलराव जाधव पाटिल म्हणाले, “सुरज जाधव यांच्या घराला समाजसेवेचा वसा आणि वारसा आहे. सुरज यांचे वडील सुधाकर जाधव हे अनेक वर्षांपासून धामणी पोस्ट मध्ये पोस्टमन म्हणुन चांगले काम करत आहेत. पोलीस पाटिल म्हणुन काम करत असताना ग्रामस्थ सर्व प्रकारे सौजन्य करतील.
यावेळी बोलताना सुरज जाधव म्हणाले, “पोलिस पाटिल मानाचे नाही तर कामाचे पद आहे असे समजुन काम करेल. पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांच्या मधील दुवा पोलीस पाटिल असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेल.
यावेळी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले, माजी सरपंच अंकुश भूमकर, माजी सरपंच सुनिल जाधव, पाणलोटचे सचिव सुभाष जाधव, शाखाप्रमुख दिपक जाधव, विशाल बोऱ्हाडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, प्रतिक जाधव, संघटक संतोष पंचरास, चेअरमन कोंडिभाऊ तांबे, माजी उपसरपंच दत्तात्रय गवंडी, पोलीस अधिकारी संदिप पवार, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच सागर जाधव यांनी केले.