लोणी काळभोर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प व पुस्तक संच देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके यांनी दिली आहे.
लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी यावेळी प्राचार्य सीताराम गवळी, प्रिंट व डीजीटल मिडिया पत्रकार संघाचे राज्याचे खजिनदार विजय काळभोर, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सुभाष अप्पा काळभोर, कार्याध्यक्ष राहुल काळभोर, विद्यालयाचे मार्गदर्शक विठ्ठल काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, उपसरपंच प्रियांका काळभोर, सेवानिवृत्त शिक्षक दिलीपकुमार सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुभाष अप्पा काळभोर म्हणाले की, विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्यांच्या सप्त गुणांना वाव द्यावा. व आजच्या प्रवेशोत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या .
दरम्यान, सरपंच सविता लांडगे यांनी प्रशालेची शिस्त, गुणवत्ता व नियोजन याबद्दल सर्व शिक्षकांना शाब्बासकी दिली. प्राचार्य गवळी यांनी प्रशालेमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या मुलींना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. व विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच स्पर्धेतूनच तुमचे प्रशालेतील अस्तित्व लक्षात येते असे सुद्धा नमूद केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके यांनी उत्साहाने केले. तसेच नवीन आलेल्या मुलींचे कौतुकही केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका वंदना सूर्यवंशी यांनी केले तर आभार सतीश कदम यांनी मानले