पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वाहकाने रविवारी (ता. २२) एकाच शिफ्टमध्ये तब्बल २० हजाराची तिकीट विक्री करण्याचा अनोखा विक्रम केला आहे. ही पीएमपीच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट विक्री आहे.
सुखदेव बाजीराव जाधव असे वाहकाचे नाव आहे.
रविवारी पुणे ते लोणावळा लोकल सेवा बंद असल्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली होती. प्रशासनाने या मार्गावर सात जास्तीच्या गाड्या सोडल्या होत्या. पीएमपीला याचा आर्थिक फायदा झाला असून पीएमपीचे या मार्गावरील उत्पन्न वाढले. सुखदेव जाधव या वाहकाने या मार्गावरील जास्तीत जास्त प्रवाशांना घेवून जाण्याचा प्रयत्न केला.
निगडी ते लोणावळा (369) या मार्गावर सुखदेव बाजीराव जाधव या वाहकाने एका शिफ्टमध्ये तब्बल वीस हजार रूपयांची तिकीट विक्री केली. त्यांच्या कामगिरीची दखल पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी घेत अभिनंदन केले आहे. ही पीएमपीच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट विक्री आहे.