पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेच्या किमती जाहिर केल्या जातात. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारतात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पापूर्वीच पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर झाले आहेत.
मागच्या काही काळापासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे तेल कंपन्यांचे लक्ष बजेटकडे अधिक लक्ष आहे. अशातच रोजप्रमाणे देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज आंतरारष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. काल कच्च्या तेलाने प्रति बॅरल $80 पार केले. ब्रेंट क्रूडचे मार्च फ्युचर्स 0.57% वाढून $82.87 प्रति बॅरल झाले. त्याच वेळी, WTI चे मार्च फ्युचर्स प्रति बॅरल $ 78.08 वर पोहोचले आहेत. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान कूडच्या किंमती (Price) प्रति बॅरल 130 डॉलरवर पोहोचल्या होत्या, तेव्हाही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत. जाणून घेऊया मुंबई-पुण्याचा आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
पुणे (Pune)
– पेट्रोल 105.54 रुपये आणि डिझेल (Diesel) 93.04 रुपये प्रति लिटर
– ठाणे
पेट्रोल रुपये 105.74 आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लिटर
– नाशिक
पेट्रोल 106.12 रुपये आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर
– नागपूर
पेट्रोल 106.21 रुपये आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर
– कोल्हापूर
पेट्रोल 105.51 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर
एसएमएसद्वारे जाणून घ्या दर…
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.