दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर (जि.पुणे) येथील शहा सांस्कृतिक भवन मध्ये माळी समाजातील विवाह इच्छुक नव वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता.५ मार्च) करण्यात आले आहे. अशी माहिती फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या मेळाव्यात विवाह इच्छुक नव वधू-वर, विधवा,विधुर व घटस्फोटीत अशा सर्व स्तरातील वधू-वर यांना आपला भावी जोडीदार निवडण्यासाठी नावनोंदणी करून सहभागी होता येणार आहे. सदर हा मेळावा विनाशुल्क असणार आहे. मेळाव्यासाठी येताना वधू- वर यांनी एक तास अगोदर मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
दरम्यान, या मेळाव्यासाठी वधू- वर यांचा बायोडाटा व्हाटसप, ऑनलाईन अथवा पोस्टाने स्विकारला जाणार नाही. मेळाव्यासाठी विवाह इच्छुक वधू-वर यांनी स्वत: समक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तरी या आयोजित वधू-वर मेळाव्यासाठी माळी समाजातील जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन फुले प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.