NCP Protests : पुणे: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवार १९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निर्णयावरुन राजकारण तापले चांगलेच आहे. राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रातूनही या निषेध व्यक्त केला जात आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर २ हजार रुपयांच्या नोटेला हार घालत श्रध्दांजली वाहत निषेध आंदोलन केले. (NCP protests in front of RBI office in Pune; Tribute by garlanding 2000 rupee note)
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झाले आंदोलन
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप दोन हजार रुपयांच्या नोटीला हार घातला. (NCP Protests) तसेच या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानी प्रतिकात्मक १० लाख रुपये किंमतीच्या २ हजार रुपयांच्या नोटा फुटपाथवर ठेवून निषेध नोंदविला.
जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला गेला. (NCP Protests) यामुळे काळा पैसा बाहेर येईल, असे त्यावेळी भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, नोटबंदीमधून काहीच साध्य झालं नाही. उलट बँकेच्या रांगेत थांबून अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. त्या सर्व लोकांच्या मृत्यूसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार होते. (NCP Protests) त्याबाबत मोदी यांनी कधीच भूमिका मांडली नाही. कर्नाटक राज्यात झालेल्या पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. (NCP Protests) या निर्णयातून काय साध्य होणार आहे. हे आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावं, अशी मागणी देखील जगताप यांनी केली.
दरम्यान, दोन हजारांच्या नोटा नागरिकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा करता येणार आहेत. (NCP Protests) या निर्णयानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Municipal Elections | महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारी लागा ! देवेंद्र फडणवासांनी दिले संकेत