-युनूस तांबोळी
पुणे : आयुष्यात येणारी संकटे त्यासाठी संघर्ष केल्यावर वेगवेगळ्या अनुभवातून मिळत गेलेलं ज्ञान. पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ज्ञानाचे उपायोजन करत निर्सगतः विशेष मुलांच्या संगोपनाला आवाहन देऊन आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन निर्मीती केली. तेवढ्यावर न थांबता 18 वर्षा पुढील मुलांसाठी उमदे व्यावसायिक कार्यशाळा चालवली जाते. अशातच शिरूरच्या राणी चोरे या विशेष मुलांसाठी (मतीमंद) भवानी, लक्ष्मी च्य़ा रूपात दुर्गा जाणवू लागली आहे.
शिरूर तालुक्यातील राणी चोरे. या आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन च्या संस्थापिका आहे. आकांक्षा व समिक्षा या स्वतःच्या दोन्ही विशेष मुलींच्या प्रेरणेतून ही संस्था सुरु करण्यात आली आहे. आकांक्षा व समीक्षा ह्यांना जन्मतः जेनेटिक आजार होता व वाढत्या वयानुसार आजाराची तीव्रता ही वाढत गेली. त्यामुळे समाजात विशेष मुलांची होणारी अवहेलना व पालकांना मिळणारी अपमानास्पद वागणुक त्या प्रत्यक्ष अनुभवातून आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही संस्था सुरु करण्यात आली. संस्था अंतर्गत आकांक्षा स्पेशल स्कुल मध्ये ज्यांना स्वतःच्या दैनंदिन गरजा पुर्ण करता येत नाही, सांगता येत नाही, अशा 30 विशेष मुलांना स्वावलंबन कौशल्य शिकवुन त्यांना सक्षम केले जाते. खुशी निवासी केंद्रामध्ये मुलांचा सांभाळ केला जातो. 18 वर्षापुढील मुलांसाठी उमदे व्यावसायिक कार्यशाळा चालवली जाते. संस्थेमध्ये विशेष मुलांचा सांभाळ केला जात असुन शैक्षणिक, सामाजिक, दैनंदिन व व्यावसायिक कौशल्य शिकवले जाते. तसेच समाजात विशेष मुले व त्यांच्या पालकांना सन्मानाने जगता यावे. यासाठी संस्थेमार्फत विविध कार्यक्रम व उपक्रम राबवले जातात. दिवाळीत या मुलांच्या वेगवेगळ्या कार्यशाळा राबवून समाजात आर्थिक व्यवहाराचे धडे दिले जातात. मनोरुग्ण, बेघर, निराधार महिला वयोवृद्ध यांचे पुनर्वसन केले जाते. कौटुंबिक व वैवाहिक व किशोरवयीन मुला-मुलींचे समुपदेशन चे कार्य संस्थेअंतर्गत केले जाते.
ही संस्था चालू असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्या समस्यांना पाहून त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी आपले कार्य सर्मथपणे सुरूच ठेवले. या काळात त्यांनी स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. एकंदरीत बी. ए,एल.एल. बी, डी.एस. इ. एम. आर, एम.एस.डब्ल्यू,कौटुंबिक व मानसिक आरोग्य समुपदेशक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या त्यांनी मिळविल्या आहेत.
समाजातील विशेष मुले ही समाजातील एक घटक आहे. या मुलांना व पालकांना समाजाना स्विकारले पाहिजे. समाजातील विशेष मुलांमध्ये तसेच बहुविकलांग मुलांमध्ये असणाऱ्या सामर्थ्याकडे पाहून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे काम मी करत आहे. व्यवहारीक दृष्या ही मुले सक्षम व्हावी. हा माझा हेतू आहे. यासाठी पुर्ण आयुष्य या मुलांसाठी सेवा करण्याचे ठरवले असल्याचे राणी चोरे यांनी बोलताना सांगितले.
संस्थेला भेटलेले पुरस्कार…
– बारामती ॲग्री फाऊंडेशन
– आरंभ ऑटीझम सेंटर औरंगाबाद विशेष सन्मान
– कोमल न्यु लाईफ फाऊंडेशन,सातारा
– राष्ट्रीय बंधुता साहित्य पुरस्कार,पिंपरी चिंचवड
– संघर्ष सन्मान पुरस्कार, मुक्तांगण संस्था पुणे
– श्रीमंत मोरया गोसावी देवस्थान ट्रस्ट,पिंपरी चिंचवड विशेष पुरस्कार
– सामाजिक कार्य विशेष सन्मान,आमदार रोहित पवार(कर्जत – जामखेड)
– मालती जोशी सामाजिक भान पुरस्कार,4cs कॉन्सलिंग सेंटर
– महाएनजीओ फेडरेशन पुणे
– सेवा दीप फौंडेशन पुष्पा नाथानी पुरस्कार
– सेवा सन्मान पुरस्कार, कराड