पुणे : Navale Bridge Accident – साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील नवले पुलाजवळील (Navale Bridge Accident) भूमकर पुलावर खोबरे तेलाने भरलेला टँकर उलटल्याची घटना घडली आहे. टॅंकर उलटल्याने रस्त्यावरुन तेलाचे पाट वाहू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. (Navale Bridge Accident)
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
रस्त्यावर टॅंकर उलटल्यामुळे झालेल्या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. परंतु रस्त्यावर खोबरे तेल पसरल्याने महामार्ग मोठ्या प्रमाणावर निसरडा झाल्याने, महामार्गावरील वाहतूक मंदावली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावरील वाहतूक संत गतीने पुढे जात आहे.
टँकर कोईमतूर तामिळनाडू येथून २४००० हजार लिटर खोबरे तेल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना, नऱ्हे येथील भुमकर पुलावर गिअर बॉक्स निकामी झाल्याने टँकर चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच सर्वत्र तेल पसरल्याने महामार्ग निसरडा झाला असल्याने इतर अपघात होण्याची शक्यता असल्याने सिंहगड वाहतूक विभाग व सिंहगड पोलीस वाहतूक सुरळीत करत आहेत.
दरम्यान, घटनास्थळी सिंहगड पोलीस सिंहगड वाहतूक विभाग तसेच मनपा अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
पुण्यातील नवले पूलाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघातात पत्नी ठार तर, पती गंभीर जखमी…!
नवले पूल नाही, शेजारच्या भूमकर पुलावर अपघात ; ४ जण जखमी, ट्रकने पिकअपला दिली धडक…!
नवले पुलावर अपघातांचे सत्र सुरुच ; भरधाव डंपरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू..!