पुणे: येणाऱ्या ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत असलेली इच्छुकांची संख्या पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविले आहेत.
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांकडूनही अर्ज मागवण्यात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे अर्ज उपलब्ध आहेत. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत असून, सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या वेळेत जमा करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे. अर्जाबरोबर शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क केवळ डिमांड ड्राफ्ट स्वरूपात स्वीकारले जाईल. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावे डिमांड ड्राफ्ट देण्यात यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
अर्ज शुल्क
* खुला प्रवर्ग: १० हजार रुपये
* इतर प्रवर्ग: ५ हजार रुपये