National Highway | पुणे : राष्ट्रीय महामार्ग ५४६ (डीडी) हा वडगाव, कात्रज, कोंढवा, उंड्री, वडकी-लोणी काळभोर, थेऊर फाटा-केसनंद ते लोणीकंद असा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला असून, या रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केली आहे. प्राधिकरणाकडून तसा पत्रव्यवहार पीएमआरडीए आणि महापालिकेस केला आहे.
या दोन्हीही यंत्रणांनी बांधकाम परवानगी दिलेल्या आणि राष्ट्रीय महामार्गाच्या आखणीत बाधित होणाऱ्या इमारतींचा आढावा घेण्यास दोन्ही यंत्रणांनी सुरुवात केली आहे. पुण्यातील वडगाव, कात्रज, कोंढवा, उंड्री, वडकी-लोणी काळभोर, थेऊर फाटा-केसनंद ते लोणीकंद अशा राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केंद्र सरकारने २०१८ मध्ये केली असली तरी अस्तित्वातील बहुतांश रस्ता हा राज्यमार्ग आहे.
नवले पूल ते कात्रज चौक या रस्त्याचे सहापदरीकरण…
केंद्र सरकारने नवले पूल ते कात्रज चौक या रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासह वडगाव, कात्रज, कोंढवा, उंड्री, वडकी-लोणी काळभोर, थेऊर फाटा-केसनंद ते लोणीकंद असा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला आहे. महापालिका हद्दीत उंड्री गावाचा नव्याने समावेश झाला आहे. या उंड्री गावातील रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा आहे.
उंड्री गावामध्ये येणारा हा रस्ता पिसोळी या गावातून येतो. पिसोळी या गावाचा महापालिकेत समावेश झाला असला तरी या गावासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) जबाबदारी देण्यात आली आहे.
उंड्री गावासह या राज्यमार्गाची रुंदी २४ मीटर गृहीत धरून अनेक ठिकाणी बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या रस्त्यास आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने या रस्त्यालगतची बांधकामे पाडावी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
महापालिका प्रशासनाकडून ११ गावांचा; तर ‘पीएमआरडीए’कडून तयार करण्यात येणाऱ्या महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखड्याचा समावेश आहे. यामध्ये केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या या राष्ट्रीय महामार्गाची आखणी करण्यात आली आहे.
उंड्री या ठिकाणी महापालिकेकडून बांधकाम परवानगी देण्यात येते. राज्य मार्गाची प्रस्तावित रुंदी २४ मीटर इतकी आहे. त्यानुसार या रस्त्यालगत अनेक ठिकाणी बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. त्याच वेळी या ठिकाणी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांनुसार या रस्त्याची आखणी प्रस्तावित रस्त्याच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूस किमान ३५ मीटर इतकी आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवानग्या या रस्त्याच्या आखणीमुळे बाधित झाल्या आहेत.
दरम्यान, ‘पीएमआरडीए’च्या प्रारूप विकास आराखड्यात या रस्त्याची आखणी करण्यात आली असली तरी उंड्री आणि पिसोळी परिसरात काही इमारतींना बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. या इमारतींना या आखणीचा फटका बसणार असल्याने संबंधितांकडून महापालिका, तसेच ‘पीएमआरडीए’चे उंबरे झिजविण्यास सुरुवात केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Loni Kalbhor : लोणी स्टेशन येथील भाजीविक्रेत्यांची मुलगी झाली पोलीस दलात भरती
Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील भाविकांना तुळजापूर येथे घेऊन गेलेल्या वाहनचालकाला मारहाण..