पुणे : पुणे शहर, बारामती आणि शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघांचा प्रचाराचा तिसरा टप्पा आता सुरू झाला आहे. त्यात मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्यानुसार महायुतीसाठी २९ एप्रिल रोजी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.
पुण्यातील एस. पी. कॉलेज मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. तर, वारजे भागात मविआसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहेत. मोदी हे याच दिवशी दुपारी लातूर या ठिकाणी सभा घेऊन पुण्यात मुक्कामी असणार आहेत. ३० एप्रिल रोजी मोदी यांची महाराष्ट्रात दुसरी सभा असल्याने ते पुण्यातून सभेच्या ठिकाणी जाणार आहेत. या दोन्ही सभांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मविआकडून तयारी करण्यात येत आहे. पुण्यात अनेक वर्षांनंतर एकाच दिवशी दोन मोठ्या नेत्यांच्या सभा असणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या या सभेच्या निमित्ताने नेते मंडळी काय संदेश देतात, हे पाहावे लागणार आहे.