पुणे : शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघात भाजपच्यावतीने नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. युवा वर्गाला व्यायाम, कसरतची आवड निर्माण व्हावी तसेच खेळाडुंना आपले क्रीडा नैपून्य दाखवता यावे म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक १५ जानेवारीपासून नमो क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून ३० जानेवारीला तो संपणार आहे. यात कुस्ती, क्रीकेट, खो-खो, कब्बडी, अॅथलेटिक्स, चित्रकला, रांगोळी, नृत्य व वकृत्व या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपा विधानसभा प्रमुख प्रदीप कंद यांच्या नियोजनाखाली नमो क्रीडा महोत्सव पार पडणार आहे. नमो चषकाची सुरुवात आज रविवार दिनांक १५ जानेवारी रोजी जाणता राजा कुस्ती केंद्रावर कुस्ती स्पर्धेने झाली. या स्पर्धेसाठी शिरुर विधानसभा मतदार संघातून एकूण २४२ कुस्तीगीर सहभागी झाले होते. स्पर्धेचे उदघाटन भाजप विधानसभा प्रमुख प्रदीप कंद यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव, हवेली भाजपा अध्यक्ष शामराव गावडे, शिरुर भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, हवेली तालुका सरचिटणीस गणेश चौधरी , पीएमआरडी चे सदस्य स्वप्निल उंद्रे, हवेली क्रीडा आघाडी अध्यक्ष शिवाजीराव महाडीक, मेघराज कटके, भरत मस्के, बाळासाहेब मल्लाव , सचिन पलांडे अदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेस पंच म्हणून मारुती सातव, तुषार गोळ, प्रदीप बोत्रे, काळुराम लोखंडे, शिल्पा धुमाळ, साईनाथ भोंडवे उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
३० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक समर्थ तरंगे याने पटकावला. तर, द्वितीय क्रमांक समर्थ चोरमले याने पटकावला. ३५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक जय हरगुडे याने पटकावला. तर, द्वितीय क्रमांक रणवीर गव्हाणे याने पटकावला. ४० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक राजवीर गव्हाणे याने पटकावला. तर, द्वितीय क्रमांक सोहम घाईतडक याने पटकावला. ४५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक सार्थक लोखंडे याने पटकावला. तर, द्वितीय क्रमांक साई दळवी याने पटकावला. ५० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक वक्रतुंड फदाले याने पटकावला. तर, द्वितीय क्रमांक मयुर जाधव याने पटकावला. ५७ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक उत्कर्ष ढमाळ याने पटकावला. तर, द्वितीय क्रमांक जय शेडगे याने पटकावला. ६५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक सनी फुलमाळी याने पटकावला. तर, द्वितीय क्रमांक अमित कुलाळ याने पटकावला. ७० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक ओंकार काटकर याने पटकावला. तर, द्वितीय क्रमांक यश कोळपे याने पटकावला. ७४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक आबा शेडगे याने पटकावला. तर, द्वितीय क्रमांक कीरण दळवी याने पटकावला. ७४ ते १२५ किलो वजनी गटात ( खुला गट ) प्रथम क्रमांक अंबर सातव याने पटकावला. तर, द्वितीय क्रमांक ओंकार येलभर याने पटकावला.