पुणे : पुणे शहरातून मोठी बातमी समोर येत आहे. आता पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार असल्याची माहिती मिळत आहे. नाव बदलण्यासंदर्भातील गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
ज्या मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यात येणार आहेत त्यामध्ये बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या स्थानकांचा समावेश आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये बुधवार पेठ स्थानकाचे नाव कसबा पेठ स्थानक, मंगळवार पेठ स्थानकाचे नाव आरटीओ स्थानक आणि नाशिक फाटा स्थानकाचे नाव कासारवाडी असे करण्यात येणार आहे.
सिव्हिल कोर्ट स्थानकाचे नाव शिवाजीनगर जिल्हा न्यायालय करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता लवकरच या मेट्रो स्थानकांची नावं बदलणार आहेत.