Nagpanchami : नागपंचमी हा सण एक महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. श्रावण महिन्यातील हा पहिला सण असून, या सणाला धार्मिक, पौराणिक, शास्त्रीय असे महत्व आहे. नागपंचमीचा हा सण विशेषत: महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नागपंचमीच्या आदल्या दिवशी किंवा नागपंचमीच्या दिवशी भारतातील स्त्रिया नागाला भाऊ मानून त्यांच्यासाठी उपवासही करतात. पण नागपंचमीच्या दिवशी हे असं करतात तरी का? तर जाणून घ्या…
अनेक कथा प्रचलित
भारतीय संस्कृतीत नागपंचमी या सणाबाबत वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. यामध्ये सत्येश्वरीची कथा सगळ्यात जास्त प्रचलित आहे. सत्येश्वरी एक देवी होती. (Nagpanchami) तिला सत्येश्वर हा भाऊ होता. मात्र, सत्येश्वर अचानक नागपंचमीच्या आदल्या दिवशी मरण पावला. त्याच्या दु:खात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. पण नंतर सत्येश्वरीला तिचा भाऊ हा नागरुपात दिसला.
…म्हणून भाऊ मानून केला जातो उपवास
सत्येश्वरीने नागाला आपला भाऊ मानले. त्या नागदेवतेने तिला वचन दिले. जी बहिण मला भाऊ मानून पूजा करेल तिचे मी रक्षण करेन. त्यानंतर त्या नागदेवतेने सत्येश्वरीला नवीन वस्त्रे अलंकार दिले. तसेच दोघांनीही जंगलात झोका खेळला. यामुळे सत्येश्वरीचे दुःख कमी झाले. (Nagpanchami) तसेच आपला भाऊ पुन्हा मिळाल्याचा आनंदही झाला. त्यामुळे या दिवशी स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याच्या मांगल्यासाठी उपवास करतात, अशी अनेक काळांपासूनची कथा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ढोल-ताशांच्या गजरात पुण्यात केसरी गणेशोत्सवाला प्रारंभ; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
Pune News : राज्यातील कारागृहात काम करणाऱ्या कैद्यांच्या पगारात वाढ ; सात हजार कैद्यांना होणार लाभ..