लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मुथुट मनी फायनान्स शाखेच्या वतीने शुक्रवारी (ता.२०) आयोजित केलेल्या हळदी कूंकवाच्या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे.
हळदी कूंकवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन कदमवाकवस्तीच्या (ता.हवेली) माजी सरपंच गौरी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुथुट मनी फायनान्सच्या सीसी मॅडम भाग्यश्री फडके तसेच प्रिया बंडगर, फिझा शेख, मनीषा गरड, प्रियांका बोंगाणे, विद्या भंडारी, शारदा राजगुरू, अर्चना बालप, ललिता तेलंग, शारदा काळे, ज्योती त्रिंबक, रेखा बोडके व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संक्रांतीनंतर सर्वत्र हळदी कूंकवाचा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये महिला एकमेकांच्या घरी जाऊन वाण लूटतात. त्यात नवीन लग्न झालेल्या महिलांसाठी हा हळदीकूंकू खूप महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने आपल्या शाखेतही महिलांना हळदी कूंकवाच्या कार्यक्रमाला बोलावून यथोचित सन्मान द्यावा, असा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे लोणी काळभोर मुथुट मनी फायनान्स शाखेचे धनंजय गुलदगड व अभिजित दौंडकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सर्वात प्रथम उपस्थित महिलांना मुथुट मनी फायनान्सच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर महिलांना गृहपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या. तसेच मुथुट मनी फायनान्सने यावेळी उपस्थितांना अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली होती.