पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मंगळवारी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत मोहोळ यांच्या नावाचा समावेश आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा अगदी सुरुवातीपासून होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रचारक सुनील देवधर आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांची नावेही चर्चेत होती. मोहोळ हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मोहोळ यांनाच उमेदवारी मिळण्याचा असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार बुधवारी भाजपकडून मोहोळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी आनंद व्यक्त केला.