पुणे : भाजपचे नेते तथा एनडीएचे गटनेते नरेंद्र मोदी आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोंदीच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला मानाचं पान देण्यात येणार आहे. याआधी राज्यातील चार खासदारांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, असं सांगण्यात येत आहे.
आता यामध्ये आणखी एका नेत्याचा समावेश झाला आहे. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी दिल्लीतून फोन आल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडीवर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, स्वप्नातही वाटलं नव्हत मंत्रिपद मिळेल, पण अचानक फोन आला आणि सांगितलं तुम्हाला शपथ घ्यायची आहे, असं मोहोळ म्हणाले.
स्वप्नातही वाटलं नव्हत मंत्रिपद मिळेल
पुणेकरांची जशी सेवा केली तशी देशाची सेवा करायची आहे. स्वप्नातही वाटलं नव्हत मंत्रिपद मिळेल, पण अचानक फोन आला आणि सांगितलं तुम्हाला शपथ घ्यायची आहे, नरेंद्र मोदी यांनी आज मार्गदर्शन केलं आहे. सगळे नव्याने मंत्री बनणारे उपस्थित होते. आगामी काळात काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चांगल काम करून पुण्याचं नाव करू असं खासदार मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले.