युनूस तांबोळी
पुणे : केंद्र सरकार संपुर्ण देशात स्मार्ट मीटर बसवून विद्युत यंत्रणा कार्यक्षम बनविणार आहे. राज्यातही या प्रक्रियेला सुरूवात झाली असून राज्यात नागपूर, चंद्रपूर आणी गोंदीया येथे विजेसाठी स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. यामुळे काही काळातच मोबाईल सारखे विजेचे मिटीर रिचार्ज करावे लागणार आहे. त्यामुळे आकडे टाकून विज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मोबाईल ज्या प्रमाणे रिचार्ज मारावा लागतो त्या प्रमाणे विजचे मीटर रिचार्ज करण्याची सुवीधा लवकरच संपुर्ण राज्यात राबविण्याची शक्यता आहे. या नव्याने सुरू होणाऱ्या विज मिटर चे कंत्राट देखील देण्यात आले असून त्याचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे.
अदानी कंपनीच्या माध्यमातून बारामती व पुणे या ठिकाणी 52 लाख 45 हजार 917 ही विजेची स्मार्ट मिटर लावण्यात येणार आहे. त्यासाठी 6, 294. 28 कोटी चे कंत्राट कंपनीला देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात स्मार्ट मीटर चा शॅाक ग्राहकांना बसणार आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विज ग्राहकांवर बोजा…
राज्यातील वीज मिटरचे कंत्राट 27 हजार कोटीचे आहे. यात केंद्र सरकार कडून 60 टक्के सवलत दिली जाणार आहे. उर्वरित 40 टक्के महावितरण कंपनीचा भाग आहे. एका मीटर साठी 12 हजार रूपये किंमत राहणार आहे. महावितरण याची वसूली ग्राहकाच्या विज बिलातून करणार आहे. असे तज्ञांची मत आहे.
फायदे :
१) मोबाईल सारखे स्मार्ट मीटर रिचार्ज करता येईल.
२) मीटर पोस्टपेड आणी प्रिपेड स्वरूपात उपलब्ध करता येईल.
३) महावितरणला मीटर रिडींगसाठी कर्मचारी पाठविण्याची गरज उरणार नाही.
४) वापरलेल्या विजेची डेटा हिस्ट्री एका क्लिक वर मिळणार
तोटे
१) स्मार्ट मिटरच्या गुणवत्तेवर प्रश्न
२) ग्रामीण भागात शेतकऱ्यांसह अशिक्षीतांना रिचार्जची समस्या
३) रिचार्ज संपण्या बाबत ग्राहकांमध्ये धास्ती..
दरम्यान, शिक्रापूरचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन म्हणाले की, महावितरण च्या माध्यमातून विज स्मार्ट मिटर बसविल्यावर विजचोरीला आळा बसेल. विज बिलामध्ये सुसुत्रीकरण निर्माण होईल. नियमीत विज बिल भरणाऱ्यांना त्याचा फायदा होईल.