विशाल कदम
Msedcl News – लोणी काळभोर : फुरसुंगी (ता. हवेली) येथील एका बड्या गृहप्रकल्पातून २२ केव्हीची विद्युत केबल उघड्यावरुन गेल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विद्युत पुरवठ्याचे काम कोणी करायचे यावरून महावितरण आणि बिल्डरमध्ये तब्बल ६ महिन्यांपासून वाद सुरु आहे. मात्र या दोघांच्या वादात १ हजारहून अधिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे महावितरण आणि बिल्डरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या बाबतचे वृत्त ‘पुणे प्राईम न्यूज’ ने मंगळवारी (ता.११) प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे महावितरणला जाग आली असून अवघ्या २४ तासाच्या आत आज (बुधवार,ता.१२) पासून कामाला सुरवात केली आहे.
फुरसुंगी येथील ”ग्रीन हाइव्ह प्लस” या गृहप्रकल्पातील घटना
फुरसुंगी येथील हरपळे वस्तीत ”ग्रीन हाइव्ह प्लस” या नावाने एक मोठा गृहप्रकल्पात आहे. या गृहप्रकल्पातील २ इमारतीत १ हजाराहून अधिक नागरिक राहतात. या इमारतीतून जमिनीखालून केबल (विद्युत वाहिनी) गेली होती. मात्र काही कालावधीनंतर या गृहप्रकल्पातील केबल बस्ट झाली. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात इतर ठिकाणाहून कनेक्शन देऊन पुन्हा विद्युत पुरवढा सुरळीत केला.
काम करण्यापूर्वीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी केबल उघड्यावरून नेली होती. त्यावेळी महावितरणचे अधिकारी आणि बिल्डरला यांच्यात केबल टाकण्यावरुन वाद झाला होता. सोसायटीतील जागेतून केबल बिल्डरने जमीनीतून टाकून द्यावी. अशी भूमिका महावितरणाने मांडली होती. तर बिल्डरने हे काम तुम्हीच करा. असा अट्टाहास धरला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून केबल उघड्यावर आहे. अशी माहिती सोसायटीतील नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात केबल बस्ट अथवा शाॅर्ट सर्किट झाले तर मोठा अपघात होऊन मोठी दुर्घटना होऊ आहे.
काम सुरु असल्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
याबाबत स्थानिक नागरिकांनी बिल्डर आणि महावितरणच्या लोणी काळभोर व फुरसुंगी येथील अधिकाऱ्यांकडे केबल जमिनीखालून नेण्यात यावी. यासाठी नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. नागरिकांनी यासंदर्भात महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिले आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना झाली नाही. एखादी मोठी दुर्घटना घडली तरच महावितरण आणि बिल्डरला जाग येणार आहे का ? असा संतापजनक सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, सोसायटीमध्ये काम सुरु झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच निर्भीडपणे बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल सोसायटीतील नागरिकांनी पुणे प्राईम न्यूजने आभार मानून भरभरून कौतुक केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
MSEDCL : महावितरणचा वीज ग्राहकांना ”शॉक” ; घरगुती वीजदरात तब्बल १० टक्के दरवाढ…!
पाण्याअभावी शेतमाल जळू लागले, उन्हाळ्यात विज बंद करू नका शेतकऱ्यांची महावितरणला आर्त हाक….!