हनुमंत चिकणे
MSEB उरुळी कांचन, (पुणे) : महावितरण MSEB अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे पूर्व हवेलीतील अष्टापूरसह परिसरातील नदीच्या गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. महावितरण कार्यालयात याबाबत निवेदन दिले असून त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. वीजेची समस्या न सुटल्यास सोमवारी (ता. २४) बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
वीज वारंवार खंडित…!
सध्या उन्हाळा असून, उष्णतेची तीव्रता वाढली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत आहे. त्यातच दिवसभर वीज गेल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले. पाणीपुरवठा वेळेत होऊ शकला नाही. शेतीतील पिकांना पाणी देता आले नाही. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित न थांबवल्यास नागरिकांनी केलेल्या उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वीज वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर मुद्द्याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नायगाव फिडरवरून येणारी लाईट ही अष्टापूर परिसरात येत आहे. मात्र मागिल १५ दिवसांपासून वीजेचा खेळखंडोबा सुरु आहे. नायगाववरून जाणारी लाईट ही कोरेगाव मूळ परिसरात थोडी समस्या निर्माण झाली तर खंडित केली जाते. त्यामुळे अष्टापूरसह परिसरात विजेच्या अभावी आहे, पिके सुद्धा जाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. शेजारी असलेल्या गावांना मोठ्या प्रमाणात विजपुरवठा केला जातो. मात्र अष्टापूरच याला अपवाद का ? असा प्रश्न शेतकऱ्यांसह उपस्थित नागरिक विचारत आहेत.
अष्टापूरचे माजी सरपंच नितीन मेमाणे म्हणाले…!
“आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण अष्टापूर गावातील महिलांसह नागरिक रस्त्यावर उतरून उरुळी कांचनसह परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलनाची सुरुवात ही अष्टापूरमधून करण्यात येईल.
“याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. वीजेच्या प्रवाहाची समस्या आहे, ती सोडवण्यात येणार आहे. दिवसा होणारा विद्युतपुरवठा संध्याकाळी करण्यात येणार आहे.
असे उपकार्यकारी अभियंता प्रवीण महामुळकर यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Uruli Kanchan : पूर्व हवेलीत दूध उत्पादकांची अवस्था हरभरे खाल्ले हात कोरडे