Mseb News : पुणे : महापारेषणच्या पुणे विभागातील महत्त्वाच्या ४०० केव्ही वाहिन्यांपैकी लोणीकंद ते कराड या अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उरुळी कांचन, वाघोली, पेरणे आदी भागांमध्ये भारनियमन ठेवण्यात आले आहे. हे भारनियमन सकाळी ९.३० वाजेपासून दिवसभर प्रत्येकी दीड तासांचे चक्राकार पद्धतीने असणार आहे. ऐन उकाड्यात हे भारनियमन असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. (Load sheding in Uruli Kanchan, Wagholi, Perne areas; Malfunction in Mahapareshan’s Lonikand to Karad power line.)
महापारेषण कंपनीचे लोणीकंद 400 केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रामध्ये विजेचा भार मोठ्या प्रमाणात वाढला. त्यातच या अतिरिक्त भारामुळे अतिउच्चदाब 400 केव्ही टॉवर लाइनमध्ये बिघाड झाला. आज सकाळच्या सुमारास या वीजवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. (Mseb News) त्यामुळे पुणे परिमंडल अंतर्गत पुरवठा होणाऱ्या सुमारे ५० ते ६० मेगावॅट विजेचे पारेषण ठप्प झाले.
या भागात भारनियमन
परिणामी ही विजेची तूट भरून काढण्यासाठी नाईलाजास्तव उरळीकांचन, वाघोली, केसनंद, पेरणे, सरतापवाडी, कोरेगाव मूळ, वाडेबोल्हाई, आष्टापूर, नायगाव आदी गावे व परिसरामध्ये सकाळी ९.३० वाजेपासून दिवसभर प्रत्येकी दीड तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागले. (Mseb News) सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत महापारेषणच्या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर या सर्व गावांतील तात्पुरते भारनियमन मागे घेण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonikand News : लोणीकंद मधील भंगार दुकानदाराला लुटणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई
Lonikand Crime : केसनंद येथील तरूणाला धारदार शस्त्राने जखमी करून लुटणार्या दोघांना बेड्या…