Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC prelims Exam: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 September 2025, 17:42
MPSC prelims Exam: MPSC exam postponed; Now the exam will be held on 'this' date...

Photo-Social Media

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC prelims Exam) येत्या रविवारी म्हणजे 28 सप्टेंबर 2025 रोजी होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा अखेर पुढे (Big Breaking) ढकलण्यात आली आहे. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून तसेच विविध राजकीय प्रतिनिधींनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवस राज्यात, विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात तर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच्या पावसामुळेच तयारीत मोठा अडथळा आलेल्या उमेदवारांना आता परीक्षेत बसणे कठीण झाले होते. गेल्या एका आठवड्यापासून पावसाने राज्यात थैमान घातले आहे. या परिस्थितीत परीक्षा घेणे उमेदवारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अवघड ठरणार असल्याचे निरीक्षण व्यक्त होत होते.

 

आयोगाने या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर परीक्षेच्या तारखेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. आयोगाने जाहीर केले की राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर रोजी होणार नाही. आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. दरम्यान, नव्या तारखेबाबत आयोगाकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवारांनी त्यानुसार तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. अनेक उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पूरग्रस्त भागातील विद्यार्थी अडचणीत असताना अशा परिस्थितीत परीक्षा घेणे अन्यायकारक ठरले असते, अशी भूमिका मांडली जात होती. अखेर आयोगाने उमेदवारांच्या भावना आणि सुरक्षिततेचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील पूरस्थिती अद्याप गंभीर असल्याने प्रशासनासमोर मदत, पुनर्वसन आणि बचावकार्य ही मोठी आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाचा निर्णय योग्य ठरल्याचे जाणकारांचे मत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

Saturday, 9 May 2026, 14:57

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा – संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

Saturday, 9 May 2026, 14:14

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी..

Saturday, 9 May 2026, 14:08
daund crime

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

Saturday, 9 May 2026, 13:11
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला ‘मनोधैर्य’तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

Saturday, 9 May 2026, 12:52

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

Saturday, 9 May 2026, 12:45
Next Post
Pune Crime: Necklace worth Rs 10 lakhs stolen from goddess idol during Navratri celebrations; Incident in Katraj

Pune Crime: ऐन नवरात्रोस्तवात देवीच्या मूर्तीवरील 10 लाखांचा हार लंपास; कात्रजमधील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.