MPSC News लोणी काळभोर, (पुणे) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तर्फे ( MPSC )घेण्यात आलेल्या परीक्षेत कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील निखिल लांडगे यांनी तीसऱ्याच प्रयत्नात यश मिळवल्याबदल रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
रेनबो इंटरनॅशनलस्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर यांच्या हस्ते श्रीफळ, शाल, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्राचार्या मीनल बंडगर, व्यवस्थापिका मंदाकिनी काळभोर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी एम.पी.एस.सी. पास झाल्यामुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या ठिकाणी निखिलचे परिसरात कौतुक केले जात आहे.
निखील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परिक्षेच्या प्रश्नांचे निरसन केले. यामध्ये परीक्षेसाठी लागणाऱ्या अभ्यासाच्या योजना सांगितल्या तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, शाळेचे चेअरमन नितीन काळभोर यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून देश सेवा करण्याची संधी मिळते यासाठी आपण सतत कार्यरत राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात ;राष्ट्रीय एकात्मता’ कार्यशाळा संपन्न..!
पाचगणी येथील भारती विद्यापीठ गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा&