Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमपीडीए गुन्ह्यातील फरार अट्टल गुन्हेगार शुभम धुमाळच्या लोणी काळभोर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 January 2025, 22:08
mpda-accused-shubham-dhumal-arrested-by-loni

लोणी काळभोर: कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील अट्टल गुन्हेगार शुभम धुमाळ याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. कारवाई झाल्यापासून आरोपी पोलिसांना चकवा देत होता. मात्र, लोणी काळभोर पोलिसांनी अखेर आरोपीला आळंदी म्हातोबाची येथे डोंगरामध्ये असलेल्या गवळेश्वर मंदिराच्या परिसरातून आज शुक्रवारी (ता.24) पहाटेच्या सुमारास अटक केली. शुभम संजय धुमाळ (वय 23,रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम धुमाळ हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर पोलिस ठाण्यात खंडणी, जबरी चोरी, दुखापत यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शुभम धुमाळ याचे वाढते गुन्हेगारी स्वरुप लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. परंतु, शुभम धुमाळ हा तडीपार आदेशाचा भंग करुन वारंवार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत होता.

दरम्यान, शुभम धुमाळ याच्यावर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी, बुटलेगर्स, ड्रग ऑफेन्डर्स आणि डेंजरस पर्सन ऍक्ट (MPDA), 1981 अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाला अमितेश कुमार यांनी मान्यता देऊन आरोपी शुभम धुमाळ याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आरोपी शुभम धुमाळ याच्यावर कारवाई झाली होती.

आरोपी शुभम धुमाळ याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यापासून तो फरार झाला होता. आरोपीने स्वतः चे अस्तित्व लपवुन कोठेतरी दडून बसला होता. आरोपीने त्याचा मोबाईल व सर्व संपर्काची साधने बंद केल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. फरार कालावधीत त्याच्या हातून पुन्हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची दाट शक्यता होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी आरोपी धुमाळ याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे एक शोध पथक तयार केले होते.

दरम्यान, गुन्हे शाखेचे शोध पथक मागील काही दिवसांपासून आरोपी शुभम धुमाळ याचा शोध घेत होते. पोलिसांनी दिवसरात्र तपास करून आरोपीचा ठावठिकाणा मिळविला. आरोपी धुमाळ याला आळंदी म्हातोबाची (ता.हवेली) येथे डोंगरामध्ये असलेल्या गवळेश्वर मंदिराच्या परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. लोणी काळभोर पोलीसांनी एमपीडीए. प्रस्तावानुसार नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात आरोपी शुभम धुमाळ याला १ वर्षासाठी स्थानबध्द केले आहे.

सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार गणेश सातपुते, विलास शिंदे,संभाजी देवीकर, सुनील नागलोत, बापू वाघमोडे, तेज भोसले, प्रशांत नरसाळे, मल्हारी ढमढेरे, योगिता भोसुरे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, चक्रधर शिरगिरे, प्रदीप गाडे, राहुल कर्डीले यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारभार उघड; ‘अंगठी’च्या नावाखाली लाखोंची लूट, ‘SIT’ च्या हाती ठोस पुरावे

Tuesday, 28 April 2026, 17:35

Junnar Pond Drowning : जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू..

Tuesday, 28 April 2026, 17:33

Pune Crime News : पुण्यात बंगल्यातच ‘गांजा शेती’चा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 28 April 2026, 17:26
Loni Kalbhor Crime

Pune News : लग्नास नकार दिल्याने तरुणीला जीवे मारण्याची दिली धमकी..

Tuesday, 28 April 2026, 17:23

Baramati News : बारामतीतील एमआयडीसी रोडवरील बेकायदा अड्ड्यांचा पर्दाफाश ; वैभव वाईन्सला नोटीस तर अंडा भुर्जी व चिकन सेंटर चालकांसह चौघांवर गुन्हे दाखल

Tuesday, 28 April 2026, 17:16

Yavat Crime : यवत पोलीस ठाणे अवैध धंद्यांत जिल्ह्यात अग्रेसर..? देहविक्री, मटका, हातभट्टी, वाळू तस्करीला संरक्षण?

Tuesday, 28 April 2026, 16:44
Next Post
Mukhyamantri Sahyatta Kaksh in every district collector office

आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.