केडगाव : गाडी क्र. 01522 दौंड वरून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी निघणारी डेमू लोकल गाडी ही 06 मार्च 2023 पासून पुणे स्टेशन ऐवजी हडपसर येथेच थांबवण्यात येते. म्हणजेच शॉर्ट-टर्मिनेट करण्यात आली आहे. ज्यामुळे शाळा व कॉलेज विद्यार्थी, पहिली शिफ्ट कामगार, भाजी, फळ, दूध व्यवसायिक यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.
ही रेल्वे गाडी हडपसर पर्यंत थांबल्यामुळे तळेगाव, पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, लोणावळा व मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना हडपसर वरून पुणे स्टेशन ला जाऊन सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांची प्रगती एक्सप्रेस पकडावी लागते. ज्यामुळे शिवाजीनगर ला जाऊन सकाळी आठ वाजून दहा मिनिटांची शिवाजीनगर – लोणावळा लोकल पकडावी लागते आणि हडपसर वरून पुणे स्टेशन ला जाण्यासाठी या वेळेत दुसऱ्या रेल्वे ची व्यवस्था देखील नाही, म्हणून खाजगी वाहतूक ने प्रवास करावा लागतो ज्यामध्ये रिक्षा दीडशे – दोनशे रुपये भाडे पुणे स्टेशन पर्यंत घेतात.
यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासनाला ट्विटर च्या माध्यमातून विनंती केली आहे की ही, 01522 दौंड – हडपसर डेमू ही लवकरात लवकर पुणे स्टेशन पर्यंत पूर्वरत चालवावी, अन्यथा प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासन विरोधात मला स्वतःला आंदोलन करावे लागेल.