MP Supriya Sule News : बारामती: उन्हाळी सुट्टी असल्याने आणि महिलांना एस टी बसच्या तिकिट दरात ५० टक्के सवलत दिल्याने प्रवाशांनी चांगलीच गर्दी वाढली आहे. मात्र एस टी बस बंद पडल्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
त्यात लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांना दिसले. यासंदर्भात त्यांनी स्वत:च व्हिडिओ शेअर करून माहिती दिली. तसेच, महामंडळाच्या एसटी बसच्या दूरवस्थेकडेही लक्ष वेधत कानउघडणी केली. (Shivshahi got trapped in the ghat, Supriyatai ran to help)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सोशल मीडियावर नेहमी एक्टीव्ह असतात. आपल्या अकाऊंटवरुन त्यांच्या प्रवासातील अनेक घटनांवरही प्रकाश टाकतात. (MP Supriya Sule News) नुकतेच लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत असताना पुण्याजवळील कात्रज घाटात एक एसटी बंद पडल्याचे सुप्रिया सुळेंनी पाहिलं. त्यानंतर, तात्काळ आपल्या कारमधून उतरत त्यांनी खोळंबलेल्या प्रवाशांची घाईघाईने मदत केली.
एसटी महामंडळाची केली कानउघडणी
बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे दिसले. गाडी नादुरुस्त झाल्याने प्रवासी पर्यायी वाहनाची वाट पाहत तिथंच उन्हांत थांबले होते. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने हे प्रवासी आणि लहान मुलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काही जणांना दुसऱ्या बसमधून खेड शिवापूरमधील टोल नाक्यावर सोडण्याची विनंती केली. (MP Supriya Sule News) तर काही प्रवाशांना माझ्यासोबत असणाऱ्या गाडीतून खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत आणल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
या गाडीतील बरेच प्रवासी सांगली आणि मिरजला जाणारे होते. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि काही सहकाऱ्यांना प्रवाशांची सोय करण्याबाबत सांगितले. हे सर्वजण प्रवासी त्याच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये पाठवेपर्यंत थांबतील असा विश्वास प्रवाशांना दिला. (MP Supriya Sule News) यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. तसेच प्रवाशांना टोलनाक्यापर्यंत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एसटी बसचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांचे खासदा सुळे यांनी आभारही मानले.
दरम्यान, एसटी महामंडळाने आपण बाहेर सोडत असणारी प्रत्येक गाडी तपासून पाठविली पाहिजे. (MP Supriya Sule News) महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील आजकाल वाढले असल्याचे प्रवासी सांगतात. राज्याच्या परीवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : अतिउष्णतेने बारामती शहरात घेतला दुचाकीने पेट ; बारामतीत सूर्य आग ओकतोय…
Baramati crime : बारामती शहरातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; दोन पिडीत महिलांची सुटका