MP Amol Kolhe : पुणे : सरकार केवळ इकॉनॉमिकल ग्रोथचे आकडे फेकते, पण दरडोई उत्पन्नावर बोलत नाही. टोमॅटोबाबत बोलताना अर्थमंत्र्यांनी हस्तक्षेपाचा उल्लेख केला; पण गेली ४-५ वर्षे दर मिळत नसल्याने शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत होते. जुन्नरमधील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी त्यांना चिठ्ठी लिहून आत्महत्या केली, तेव्हा हे सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला का आले नाही? याला सरकारचे चुकीचे निर्यात धोरण कारणीभूत आहे, अशी घणाघाती टीका करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा जळजळीत सवाल लोकसभेत उपस्थित केला.
अविश्वास प्रस्तावावर बोलताना सरकारवर निशाणा
लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला. कोल्हे म्हणाले की, या सरकारवर कसा विश्वास ठेवायचा? केंद्र सरकार सातत्याने किसान सन्मान निधीचा उल्लेख करते; परंतु किटकनाशके आणि खतांच्या किंमतीत ४ ते ५ पट वाढ झाली, हे मात्र सांगितले नाही. गृहमंत्री म्हणतात आकडे कधी खोटं बोलत नाहीत. (MP Amol Kolhe) हे सरकार केवळ इकॉनॉमिकल ग्रोथचे आकडे फेकते, पण दरडोई उत्पन्नावर बोलत नाही.
अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचते असं म्हणता, तेव्हा दरडोई उत्पन्नामध्ये जगात आपण १४१ क्रमांकावर आहोत, या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. (MP Amol Kolhe) याचाच अर्थ देशाची संपत्ती काही मोजक्या धनदांडग्यांच्या हातात एकवटत आहे, असा होतो, अशी टीका डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. आजच्या सरकारची कार्यपद्धती पाहिली की, गांधीजींच्या तीन माकडांची आठवण होते असं सांगत सरकारच्या विरोधात काही ऐकू नका, निवडणुका वगळता देशाच्या परिस्थिती बघू नका आणि विरोधी पक्षनेत्यांची तोंड बंद करा ही सरकारची नीती असल्याचेही कोल्हे यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकत्याच मिळालेल्या लोकमान्य टिळक पुरस्काराचा संदर्भ देत खासदार डॉ. कोल्हे यांनी भाषणाचा समारोप करताना ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा सवाल सभागृहात उपस्थित केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
MP Dr. Amol kolhe : आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा : खासदार डॉ. अमोल कोल्हे