पुणे : पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी एक नवा विश्वविक्रम केला आहे. त्याची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नुकतीच झाली आहे. अभिजित गायकवाड यांनी २५०० फूटउंचावरुन पॅरामोटरींग करत रस्ता सुरक्षा जनजागृती होण्याच्या दृष्टीकोनातून ११ विविध प्रकारचे रस्ता सुरक्षाविषयक संदेश फलक दाखवले आहेत. गायकवाड यांच्या नावाने या विश्वविक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
अभिजित गायकवाड यांनी हे जेजुरी येथील फ्लाईंग राहिनो पॅरामोटार यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन २५०० फूटउंचावरुन पॅरामोटरींग करत रस्ता सुरक्षा जनजागृती होण्याच्या दृष्टीकोनातून ११ विविध प्रकारचे रस्ता सुरक्षाविषयक संदेश फलक एका पाठोपाठ एक असे दाखवून एक अनोखा उपक्रम केला. या उपक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली आहे. त्याअनुषंगाने मेडल आणि प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. ही उल्लेखनीय बाब असून रस्ता सुरक्षा संदेश जनमाणसांमध्ये प्रसारित करण्याच्या महत्वपूर्ण व उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य सरकारने त्यांचे अभिनंदन केले.
अभिजीत गायकवाड यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते व प्रथम प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड व उर्मिला पवार तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2024 रोजी सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले.