पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशातच पुण्याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील एकही जागेवर एकनाथ शिंदेंची शिवसेना उमेदवार देणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पुण्यातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा शिवसेनेने दावा सोडला असल्याचे समजते.
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सेनेचा एकही इच्छुक उमेदवार नाही. पुणे शहरातील एका जागेवर सुद्धा शिवसेना आपला उमेदवार उभा करणार नाही. अशी माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील २ जागांवर शिवसेना आग्रही असून पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हडपसर आणि कोथरूड या दोन्ही मतदारसंघांवर दावा ठोकण्यात आला आहे.