पुणे : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पोटच्या मुलीचा आईने व तिच्या प्रियकराने मिळून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी आईला न्यायालयाने जामीन दिला आहे. महिला आरोपीला जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी दिली.
लक्ष्मी संतोष गवई (वय 26 वर्षे. धंदा मजुरी रा.मु.पो खिरपुरी बुः ता. बाळापूर जि. अकोला.) असे जामीन मंजूर झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे.हा प्रकार 2 मार्च 2023 मध्ये घडला होता. या प्रकरणाबाबत खडकी पोलीस स्टेशन येथे 3/3/23रोजी पोलिस उप निरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी आय. पी. सी. 302, 201 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सदर प्रकरणातील फिर्यादी आण्णा बादशहा गुंजाळ, पोलीस उप-निरीक्षक हे खडकी पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. तसेच ते बोपोडी चौकी येथे प्रभारी अधिकारी म्हणुन काम पाहत असताना दि. 2/3/2023 रोजी सकाळी नऊ वाजता खडकी पोलीस ठाण्यात दिवसा कर्तव्य बजावताना दैनंदिन कामकाज करत असताना तीन वाजण्याच्या सुमारास ठाणे अंमलदार पोलीस उप-निरीक्षक, अर्जुन बेंदगुडे यांनी फोनव्दारे करून कळविले की, खडकी रेल्वे स्टेशन समोरील सी.ए.एफ.व्ही.डी.चे मोकळे मैदानाच्या कडेला एक 2.5 ते 3 वर्षाची मुलगी बेशुध्द पडलेली आहे. त्यानंतर फिर्यादी स्वतः व पोलीस हवालदार 725/ मुलाणी यांच्यासह वरील नमूद असलेल्या घटनास्थळी गेले. तेथे गेल्यानंतर अॅम्बुलन्स बोलावुन त्यामधुन बेशुध्द मुलीला ससुन हॉस्पीटल येथे उपचारासाठी घेवुन गेले. तेथे डॉक्टरानी मुलीस तपासुन 6 /8 वाजता तपासणीपुर्वी मयत झाल्याचे घोषीत केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील आरोपी संतोष देवमन जामनिक वय 26 वर्ष धंदा- सेंट्रींगकाम रा.मु.पो. खिरपुरी ता. बाळापूर जि. अकोला 2) लक्ष्मी संतोष गवई वय 26 वर्षे. धंदा मजुरी रा.मु.पो खिरपुरी बुः ता. बाळापूर जि. अकोला यांनी आपआपसांत संगनमत करून दोघांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेली आरोपी महिला लक्ष्मी हिची मुलगी समिक्षा संतोष गवई वय 2 वर्षे हिस आरोपी यांनी महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण कार्यालय औंध रोड, स्पायसर कॉलेज पुणे येथील आवारातील मिती पलिकडे बांधकाम कामगारांकरिता तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या चाळीतील खोली नंबर 4 मध्ये आरोपी व तिच्या प्रियकराने हाताने मारहाण करून तिस ढकलून देऊन व आरोपी लक्ष्मी हिचा वापरता स्टोल (रुमाल) ची बारीक दोरी सारखी गुंडाळी करून सदर दोरीने मुलगी समिक्षा हिला गळफास देऊन तिचा खुन केला. खून करून तिचा मृतदेह रात्रभर जवळ ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी औंध रोड येथून आरोपी महिला लक्ष्मी गवई व संतोष जामनिक यांनी आपल्या सोबत घेऊन तो खडकी रेल्वे स्टेशनकडून खडकी बाजारकडे जाणाऱ्या महात्मा गांधी रोडच्या दक्षिण बाजुस असलेल्या भारतीय सैन्य दलाच्या सी.ए.एफ.व्ही.डी.चे फुटबॉल मैदानाच्या उत्तरेस चिकुच्या झाडाजवळ, खडकी पुणे येथे टाकून दिला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्येशाने बेवारसपणे टाकून दिला असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. म्हणून भा.दं.वि कलम 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा केला.
दरम्यान, या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी महिला आरोपीने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्या मार्फत कोर्टात अर्ज केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी युक्तिवाद करून आरोपीची बाजू मांडली. त्याचप्रमाणे सरकारी वकील यांनी जामीन मिळू नये यासाठी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर न्यायालयाने सर्व बाजूचा विचार करता महिला आरोपीचा अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला. या प्रकरणामध्ये ॲड. आनंद चव्हाण, ॲड. अफरोज जहागीरदार, ऋषिकेश पाटील, आशुतोष गडदे यांनी मदत केली.