पुणे : कोणतेही कारण नसताना मुलगा व आईला चक्क दगडाने मारहाण करुन जखमी केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीला आली आहे. याच गुंडांनी चारचाकी व एका दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केले. हा प्रकार औंध येथे रविवारी (ता. १०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत निलेश तानाजी पवार (वय-३०, रा. वेस्टन रिव्हर बिल्डींग, डी मार्टसमोर, औंध, मूळ रा. चांदे-नांदे, ता. मुळशी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन सिद्धेश सर्जेराव पढेर (वय-२५), सोमनाथ मल्हारी पढेर (वय-२५), मल्हारी दत्तु पढेर (वय-५०), सुनीता सर्जेराव पढेर (वय-४२, सर्व रा. वेस्टन रिव्हर बिल्डींग, डी मार्टसमोर, औंध) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा चुलत मामाचा मुलगा आहे. आरोपींनी काही कारण नसताना फिर्यादी व त्यांच्या आईला दगडांनी व बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच शिवागाळ करुन फिर्यादी यांच्या चारचाकी व पल्सर दुचाकीवर दगड मारून नुकसान केले.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.