योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिक्रापुर (ता. शिरुर) येथे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मैत्रीचे संबंध प्रस्थापित करत गेल्या तीन वर्षांपासुन वारंवार मानसिक त्रास देत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी सलीम पप्पु शेख (वय-२१) रा. शिकापुर, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरोधात शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी व आरोपी सलीम शेख यांची मागील तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मागील एक वर्षापासून दोघेही फोनवर बोलत होते. ऑगस्ट २०२३ पासुन शेख युवतीचा पाठलाग करुन बोलण्याचा प्रयत्न करायचा. तसेच वारंवार फोन करुन मानसिक त्रास द्यायचा. पिडीत युवतीने ‘मला तुझ्या सोबत बोलायचे नाही’, असे सांगितले होते. तरीही तो बोलण्याची विनंती करायचा.
सप्टेंबर २०२३ मध्ये पिडितेला घराच्या बाहेर बोलावून घेत ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे’ असे बोलून त्याने युवतीच्या हाताला धरुन विनयभंग केला. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यावर त्यांनी आरोपी आणि त्याच्या वडिलांना सांगितले. यावेळी त्यांनी आईची माफी मागितली
दरम्यान, अल्पवयीन मुलगी मार्च २०२४ मध्ये पोलीस भरतीची तयारी करीत असताना आरोपीने पिडितेला फोन करुन तु अकॅडमीमध्ये का गेलीस, घरी परत ये नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेन, अशी धमकी दिली.
घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार आईला सांगितला. यानंतर आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.