Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाला अटक, कोंढव्यातील प्रकार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 17 June 2024, 19:06

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका तरुणाने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत घरात घुसून गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत तरुण जबरदस्तीने घरात घुसला. तसेच तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन मोबाईलमध्ये फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी २३ वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत १३ वर्षाच्या पिडीत मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रोहित शिवाजी देवके (वय-23 रा. लक्ष्मी पार्क, महमदवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते १५ जून २०२४ या कालावधीत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. याचा गैरफायदा घेत आरोपी जबरदस्तीने घरात शिरला. त्याने मुलीला जवळ ओढून अश्लील वर्तन करून त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो काढून विनयभंग केला. त्यानंतर मुलीचा वारंवार पाठलाग केला.

पिडीत मुलगी शिलाई मशीनच्या क्लासला गेल्यानंतर क्लासच्या बाहेर तिला आडवले. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्यबरोबर लग्न कर, नाही तर मी तुझ्या आई-वडीलांना मारुन टाकेन. तसेच मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Friday, 20 November 2026, 23:02

मारुंजी येथे तारेचे कुंपण घालण्याच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; बाप-लेकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Friday, 20 November 2026, 21:31

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57
Next Post

दापोडी येथील मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या : आमदार राहुल कुल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp