शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील बाभुळकर रोड येथे राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश नारायण गेडाम (रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मोझर इजारा ता. दारवा जि. यवतमाळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश हा कारेगाव येथील अल्पवयीन तरुणी घरी एकटी असताना घरात घुसला. एकटी असल्याचा फायदा घेत त्याने मुलीला पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा आरोपीने घरात घुसून मुलीशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीची आई घरात आली असता मुलगी रडत असल्याने तिच्या आईने तिच्याकडे विचारपूस केली. यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला.
याबाबत पीडित मुलीच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गणेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.