पुणे : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या टोळीप्रमुखासह चौघांवर गुन्हे शाखा ६ च्या पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी) अंतर्गत कारवाई केली आहे.
रोहीत विठ्ठल आखाडे (वय-२६, रा- ८४/१६५, गुरुजन सोसायटी, शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे (टोळी प्रमुख) त्याचे साथीदार आकाश सुरेश कंधारे (वय-२३, मु पो. चिंचवडे, बेलावडे, ता. मुळशी) संकेत कैलास धाईजे वय-२६, रा. शिवाजी हासींग सोसायटी १०/२ आशानगर, सेनापती बापट रोड, गोखलेनगर पुणे), राजु कु-हाडे रा. पुणे) अशी मोक्कानंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपी हे कुख्यात गुड निलेश घायवळ टोळी मधील सदस्य असुन त्याने व त्याच्या टोळीने दहशत निर्माण करून गुन्हयांची शृंखला चालुच ठेवल्याचे व त्यातुनच ते स्वतःचा आर्थिक फायदा करून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.
कोंढावळे बेलावडे (ता. मुळशी) भागात विक्रीकरिता शेतजमीन दाखवतो अशी बतावणी करून फिर्यादीस जनीन न दाखवता रोहित आखाडे याने जीवे मारण्याची धमकी देऊन ६० लाख रुपये खंडणी मागितली. फिर्यादीने जिवाच्या भितीने ५० हजार रुपये खंडणी दिली. यावरून आखाडे याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने प्रस्तुत गुन्हा केला असल्याचे दिसुन आलेने वेळोवेळी त्यांचेविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा ते कायदयास जुमानत नसल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अन्वये गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखेचे श्रीनिवास घाडगे यांचे मार्फतीने रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, यांना अहवाल सादर केला होता.
सदर प्रकरणाची छानणी करून आरोपी रोहीत विठ्ठल आखाडे व त्याचे साथीदार यांचे विरुद्ध या प्रस्तावाची पडताळणी करुन वरील टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. सदर गुन्हयाचा पुढील तपास नारायण शिरगावकर, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे -२) पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, भैरवनाथ शेळके, पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, पुजारी, खेडकर, मेमाणे, सकटे, कारखेले, लाहिगुडे, वाकवणे व्यवहारे, पवार काटे, टिळेकर, घाडगे, तांबेकर, काळे यांनी केली आहे.