पुणे : Vasant More -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरातील डॅशिंग नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे (Vasant More) यांचे नाराजी नाट्य अद्याप सुरुच आहे. सातत्याने पक्षात ते नाराज असल्याची चर्चा रंगते. दोन ते तीन दिवसांपूर्वींच खास मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्या्ंच्यासाठी भेटीसाठी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यामुळे आता मोरे (Vasant More) यांची सगळी नाराजी दुर झाली असेल असे वाटले होते. मात्र पुन्हा ते नाराज झाल्याचे वृत्त आल्याने राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे. (Vasant More)
मनसेतच राहणार असल्याचे ठणकावून सांगितले
शहर मनसे पदाधिकारी सातत्याने त्यांना डावलत असल्याची माहिती आहे. त्यामुळे सातत्याने त्यांचे खटके उडत असतात. त्यांच्या नाराजीमुळे ते आता मनसे सोडणार अशीही चर्चा रंगली होती. मात्र त्यांनी मनसेतच राहणार असल्याचे ठणकावून सांगितले होते.
यंदा मनसे कसबा विभागाच्या वतीने आरतीचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा गुरुवारी सुरु झाली. त्यामुळे पुन्हा एकदा मोरे यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.
वसंत मोरे म्हणाले, ”माझ्या विरुद्ध पक्षातून षडयंत्र केले जात आहे. ठरवून पक्षातील काही लोकांकडून मला डावललं जात आहे. शिवतीर्थावर दोन नंबरच्या रांगेत बसणारा मी आहे. परंतु माझं नाव पत्रिकेत वगळलं जातंय. मला आता ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. मी लवकरच राज ठाकरे यांच्यांशी बोलणार आहे.