पुणे: शरद मोहोळ हत्या प्रकरणानंतर पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. कोथरूड परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार करून होणारे खून आणि हादरवून सोडणारे आणि इतर गंभीर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. ललित पाटील प्रकरणात अनेक कारवाया केल्या पण संजीव ठाकूरला का अटक केली नाही? हा देखील प्रश्न निवेदनात मांडला आहे.
ललित पाटीलने अनेकवेळा संजीव ठाकूर यांना पैसे दिले. मात्र, आजपर्यंत संजीव ठाकूर यांना अटक का केले नाही? तसेच अटक करा अन्यथा पुन्हा आंदोलन करू असेही त्यांनी म्हटले आहे. यासोबतच कोथरूड भयमुक्त करा. कोथरूडमध्ये अनेक वर्ष दहशतीचे वातावरण आहे. भाजपची सत्ता आहे. कोथरूडमध्ये आमदार आणि नगरसेवक भाजपचे असल्याने तेथील गुन्हेगारांना भाजपचा आश्रय आहे. चंद्रकांत पाटील यांचा याच गुन्हेगारांनी प्रचार केला होता. आजही हे गुन्हेगार चंद्रकांत पाटलांसोबत फिरतात म्हणून पोलीस कारवाई करत नाहीत, असा आरोप देखील यावेळी रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.