यवत: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मतदान प्रक्रिया पार पडताच दौंड तालुक्यातील यवतजवळ असलेल्या नाथाचीवाडी या आपल्या मूळगावी भेट दिली. गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असल्याने मूळ गावी येता त्यांना येते आले नव्हते. त्यामुळे निवडणूक संपताच विश्रांतीसाठी ते आपल्या गावी आले होते. पुन्हा ते पुणे येथे जात असताना यवत येथील युवा तरुणांची व ग्रामस्थांची त्यांनी भेट घेतली. रवींद्र धंगेकर यांचे यवतकरांनी उत्साहात स्वागत केल. यावेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. यवत ग्रामस्थांच्या वतीने आमदार रविंद्र धंगेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुक १३ मे रोजी पार पडली. या निवडणुकीत भाजपा विरुद्ध जनतेत सुप्त लाट आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील राजकीय डावपेच पाहता माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या नंतर काँग्रेस पक्षाला उतरती कळा आली होती. मात्र, आठ महिन्यांपूर्वी आमदारकीची निवडणूक लढवून विजय खेचून आणला आणि पुणे लोकसभा मतदार संघात पुन्हा काँग्रेस पार्टीचे वर्चस्व निर्माण केले. दिवंगत नेते खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर नंतर पोटनिवडणूक घेण्याचे धाडस सत्तेत असलेल्या भाजपाने केले नाही. उलट पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ केली असल्याचे दिसून आले. सामान्य जनतेच्या मनात भाजपा विरुद्ध सुप्त लाट असून पुणे लोकसभा मतदार संघात विजय निश्चित आहे. तसेच बारामती, शिरूर व मावळ लोकसभेत देखील महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अँड.प्रकाश सोळंकी, डॉ. संतोष बडेकर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर, मुस्लिम समाजातील युवा कार्यकर्ते समीर सैय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मयुर दोरगे, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोहसिन तांबोळी, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते सचिन दोरगे, पोपट दोरगे, दिलिप दोरगे,लीयाकत शेख,अजीत तांबोळी, विनायक देवकर यांसह यवत गावातील युवा तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.