गणेश सुळ
MLA Rahul Kul : केडगाव : पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्याचे प्रयत्न आहेत. राज्यातील खासगी पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यवसायिकांसाठी दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्यासाठी डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कायद्याचे प्रारुप मी स्वतः विधीमंडळात मांडेन, असे प्रतिपादन दौंड मतदार संघाचे आमदार राहुल कुल यांनी केले.
पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्याचे प्रयत्न
पुणे येथे पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नारायण जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जोशी म्हणाले, पदविकाधारक पशुवैद्यकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने योग्य उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे. दुधाचे दर किंवा गायीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या तरी राज्यातील पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या समस्या आजदेखील तशाच आहेत. याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष करु नये. MLA Rahul Kul
कुल म्हणाले, नवीन बारावी विज्ञाननंतर तीन वर्षांचा डिप्लोमा इन व्हेटेनरी सायन्स अभ्यासक्रम लवकरात लवकर म्हाफसु विद्यापीठ नागपूरमार्फत सुरू करण्याबाबत पाठपुरावा करू. पशुसंवर्धन विभागातील सुधारीत कायद्यांतर्गत पशुवैद्यकीय अधिसूचना तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. MLA Rahul Kul
यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ. सागर आरुटे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष बडेकर, सहसचिव डॉ. निवृत्ती पोखरकर आदींनी या मनोगत व्यक्त केले. खजिनदार डॉ. वैभव पाटील यांनी संघटनेच्या संदर्भात आर्थिक अहवाल सादर केला. MLA Rahul Kul
मेळाव्यास डॉ. सुकुमार कुलकर्णी, डॉ. विकास वाव्हळ, डॉ. विजय कबाडे, डॉ. वैभव पाटील यांच्यासह राज्यभरातून पशुवैद्यकीय व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. महेश जांबले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. सागर आरुटे यांनी आभार मानले.