राहुलकुमार अवचट
Daund News : यवत : दौंड – सिद्धटेक अष्टविनायक मार्गावर एका दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याचे पाहून दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी स्वतःच्या गाडीतुन ग्रामीण रुग्णालय दौंड येथे पाठविले. रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून अपघातग्रस्त व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिल्याने पुढील अनर्थ टळला. (MLA Rahul Kul rushed to help the accident victim on Daund – Siddhatek road)
जखमीला स्वत:च्या वाहनातून उपचारासाठी हलविले
आलेगाव (ता. दौंड) येथे एका नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना दौंड – सिद्धटेक अष्टविनायक मार्गावर एक दुचाकी व चार चाकी वाहनाचा अपघात झाल्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्या निदर्शनास आले. (MLA Rahul Kul News) तात्काळ आमदार कुल यांनी त्यांची गाडी थांबवून अपघातग्रस्त दुचाकी स्वराला त्यांच्या स्वतःच्या गाडीतून तात्काळ ग्रामीण रुग्णालय दौंड येथे हलविले.
स्वतः रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून अपघातग्रस्त व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय मदत करण्याचे सांगितले. (MLA Rahul Kul News) आमदार कुल यांनी दाखविलेल्या समयसूचकता व संवेदनशीलतेचे परिसरात कौतुक होत असून त्यांना लोक आरोग्यदूत का म्हणतात याचाच आज पुन्हा प्रत्यय आला.
दरम्यान, प्रशस्त अशा दौंड सिद्धटेक अष्टविनायक मार्गाचे काम झाल्यापासून या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून चारचाकी वाहने सुसाट धावतात यानिमित्ताने रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. (MLA Rahul Kul News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
MLA Rahul Kul News : आमदार राहुल कुल यांना मंत्रीपद मिळणार ? दौंडमध्ये चर्चांना उधाण…
Mla Rahul Kul News : पालकमंत्री स्तरावरील योजनांचा फेरआढावा घेण्यात यावा : आमदार राहुल कुल
Yavat News : वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांची बैठक