लोणी काळभोर, (पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने बारावीचा निकाल मंगळवारी (ता.२१) दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर बारावीच्या परीक्षेत सुनेहा चक्रवर्ती हिने ९४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्य रिपल शर्मा यांनी दिली आहे.
बारावीच्या परीक्षेत विद्यालयातील कला शाखेतील १७ विद्यार्थी , वाणिज्य शाखेतून ८० विद्यार्थी तर विज्ञान शाखेतून १६७ असे एकूण 264 विद्यार्थी बसले होते. त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. कला शाखेतून सुनेहा चक्रवर्ती हिने ९४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक, तर रविना चौधरी हिने ९३.३३ गुण मिळवून द्वितीय तर असमी रामपुरे हिने ९०. ३३ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
विद्यालयाच्या वाणिज्य विभागातून श्लोक गोरे यांनी 93.67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटविला आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी मान्या अशर हिने 89.33 टक्के गुण मिळवून द्वितीय तर संस्कार दिवेकर याने 88.67 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विद्यालयाच्या विज्ञात विभागात सारंग मेस्टे याने 87.67 टक्के गुण मिळवून प्रथम, विवेक घनवट याने 85.67 टक्के गुण मिळवून द्वितीय तर श्रावणी मेमाने हिने 85.33 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान, विद्यालयाचे विद्यार्थी सारंग मेस्टे व वरद शिंदे यांनी गणित या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे लोणी काळभोर सह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे एमआयटीच्या मुख्य कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे व शैक्षणिक विभाग प्रमुख ज्योतवानी यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.