पिंपरी : पिंपरी शहरामधून एका १८ वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीवर ५० वर्षीय शाळेतील शिपायाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी १६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास निगडी येथे एका शाळेच्या आवारात घडली असून हा प्रकार 2022 पासून सुरु होता. याप्रकरणी शाळेतील शिपायांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण कुमाजी ठुबल (वय- ५०, रा. गणेशनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत निगडी पोलीस स्टेशनमध्ये १९ जुलै रोजी ३८ वर्षीय महिलेने आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण ठुबल हा निगडीच्या एका शाळेत शिपाई म्हणून काम करत आहे. त्याने याच शाळेतील एका १८ वर्षीय मुलीचा गतीमंद असल्याचा फायदा घेत, तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तिला काही समजत नसल्याने ती कोनाला काहीच सांगत नव्हती. मुलीला अश्लिल व्हिडीओ दाखवून तिला महिलांच्या स्वच्छतागृहात नेत तिच्यावर नराधमाने बलात्कार केला आहे.
२०२२ ते २०२४ या कालावधीत वारंवार लैगिक अत्याचार सुरु होता .हा प्रकार 16 जुलै रोजी उघडकीस आला आहे. दरम्यान, महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नराधम आरोपीला निगडी पोलिसांनी गुन्हा केला असून, पुढील तपास पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक माळी करत आहेत.