शिक्रापूर (पुणे): तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रावणी संतोष सांभारे (वय १७, रा. निमगाव भोगी, ता. शिरूर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत संतोष रामदास सांभारे (वय ४५ रा. निमगाव भोगी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रणव अशोक उबाळे (रा. ओयासीस कॉलनी, रामलिंग रोड शिरुर ता. शिरुर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर शहरात शिक्षण घेणारी श्रावणी गोलेगाव येथे तिच्या मामाच्या गावी राहत असून ती महाविद्यालयात जात असताना प्रणव उबाळे हा वारंवार भेटून त्याच्याशी बोलण्याबाबत दबाव टाकत होता. मुलीने भेटण्यास व बोलण्यास नकार देत असल्याने प्रणव याने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर तुझी बदनामी करेल अशी धमकी देखील श्रावणीला दिली. त्रास असह्य झाल्याने तीने आत्महत्या केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करत आहेत.