इंदापूर : इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद साबळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवन, मुंबई येथे बारामती लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख माजी मंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख संजय मशिलकर व युवा सेना प्रदेश सचिव किरण साळी यांच्या उपस्थितीत मिलिंद साबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर मिलिंद साबळे यांना इंदापूर तालुका युवासेना प्रमुखाची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली. याबाबतचे पत्र युवा सेना प्रदेश सचिव किरण साळी यांच्या हस्ते साबळे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना महिला संपर्कप्रमुख ॲड. गीतांजली ढोणे, पुणे जिल्हाप्रमुख सीमा कल्याणकर, कांता पांढरे, अण्णा काळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या कार्याने प्रभावित झाल्याने शिवसेनेत
शिवसेनेत प्रवेश करताच मिलिंद साबळे म्हणाले की, ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन मी हा पक्षप्रवेश केला आहे. मला पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे पक्षाशी एकनिष्ठेने प्रामाणिकपणे समाजातील सर्व घटकांसाठी कार्यरत राहणार आहे’.